कृष्णा सोबती लिखित मित्रो मरजानी
एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्ही खूप प्रशंसा ऐकावी, त्याच्या उल्लेखनीय असण्याची नोंद घ्यावी पण काही ना काही कारणाने ते पुस्तक वाचायचं राहून जावं असं माझं ‘मित्रो मरजानी’च्या बाबतीत बऱ्याच वेळा झालं. कधी कधी तर हि अतिप्रशंसा पुस्तकाच्या दर्जाबद्दल देखील प्रश्न उपस्थित करते कारण सध्याच्या काळातील ओव्हर हाईप्ड चीजा खरोखरचं तितपत चांगल्या असतील याची काहीही शाश्वती नाही. पण […]
