From Words To Views: Monica, O My Darling

If you are looking for a thrilling ride with fast paced storyline and superb acting chops, then this is the film for you. Not only it’s has a madcap motley crew but it also hilariously dramatic in almost all the frames. Based on the Japanese novel called Burutasu No Shinzou (Eng: Heart of Brutus), first…

कृष्णा सोबती लिखित मित्रो मरजानी

एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्ही खूप प्रशंसा ऐकावी, त्याच्या उल्लेखनीय असण्याची नोंद घ्यावी पण काही ना काही कारणाने ते पुस्तक वाचायचं राहून जावं असं माझं ‘मित्रो मरजानी’च्या बाबतीत बऱ्याच वेळा झालं. कधी कधी तर हि अतिप्रशंसा पुस्तकाच्या दर्जाबद्दल देखील प्रश्न उपस्थित करते कारण सध्याच्या काळातील ओव्हर हाईप्ड चीजा खरोखरचं तितपत चांगल्या असतील याची काहीही शाश्वती नाही. पण…

सानिया लिखित ओमियागे

सानिया यांच्या कथेतील स्त्रिया ह्या बहुतेक एका विशिष्ट सामाजिक-आर्थिक वर्गातून आलेल्या दिसतात. स्वतंत्र विचारसरणी, व्यवस्थित किंवा उच्च शैक्षणिक पार्शवभूमी आणि स्वतःचे निर्णय घेण्याची मानसिक कुवत असण्याऱ्या स्त्रिया त्यांच्या कथेमध्ये मध्यवर्ती असतात. बहुधा शहरी किंवा निमशहरी भागातील या स्त्रिया एका ठराविक विचारसरणीनुसार त्यांचं आयुष्य व्यतित करणं उचित समजतात. ओमियागे या दीर्घ कथासंग्रहामधील अनिता, सुजाता, सरिता, श्यामल…

महाश्वेता देवी लिखित जटायु

महाश्वेता देवी या त्यांच्या लेखनाच्या अनोख्या शैलीमुळे आणि मुख्यतः ग्रामीण पार्श्वभूमी असण्याऱ्या कथावस्तूंमुळे चिरपरिचित आहेत. त्यांच्या कथा ह्या बहुत करून पूर्वोत्तर राज्यांमध्ये घडतात आणि उपेक्षित, शोषित लोकांच्या व्यथांची गडद छाया त्यांवर पडलेली दिसून येते. उपरोल्लिखित कादंबरी जरी कलकत्ता आणि आसपास घडत असली तरीही कथेच्या पूर्वपीठिकेमध्ये डोकावण्याऱ्या गावांची, वनांची त्यावर दाट सावली आहे. हि कथा घडते…

गिरीश कुबेर लिखित एका तेलियाने

खनिज तेल आणि त्याचा जगाच्या राजकारणावर तसेच अर्थकारणावर होणारा परिणाम या विषयाला वाहिलेलं हे लेखकाचं दुसरं पुस्तक. यामध्ये मुख्य फोकस आहे तो तेलाच्या जगड्व्याळ व्यापाऱ्यात गुंतलेल्या लोकांवर आणि प्रामुख्याने उल्लेख केलेल्या शेख झाकीर यामानी यांच्यावर. पुस्तकाचा केंद्रबिंदू म्हणता येईल अशा यामानी यांच्या कथेकडे वळण्याआधी लेखक आपल्याला खनिज तेलाच्या शोधामध्ये आणि व्यापारामध्ये गुंतलेल्या देशांची, लोकांची संक्षिप्त…

Belinda By Anant Samant

अनंत सामंत यांच्या कथा आणि कादंबऱ्या त्यांच्या अतिशय वेगळ्या अशा दर्यावर्दी भवतालामुळे, त्यातील खलाशी आणि देशोदेशीच्या नानाविध लोकांच्या कहाण्या मांडण्यामुळे अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ह्या वेगळेपणामुळे त्यांचा असा खास वाचकवर्ग आहे. बेलिंदा ही शीर्षकथा आणि इतर लघुकथा असलेला हा कथासंग्रह देखील आपली निराशा करत नाही. ह्यामधील बेलिंदा आणि ती ही कथा हि समुद्राच्या, जहाजच्या प्रवासात…

एन्कीच्या राज्यात आणि काळेकरडे स्ट्रोक्स

विलास सारंग आणि त्यांची लेखनशैली ह्याबद्दल मी एकूण होते; पण कधीही वाचण्याचा योग आला नव्हता. त्यामुळे एन्कीच्या राज्यात हे त्यांचं मी वाचलेलं पहिलचं पुस्तक, पण अनोळखी लेखक असल्याचं अजिबात जाणीव करून देत नाही. पुस्तकाचा नायक हा एक प्रोफेसर आहे, अमेरिकेत राहून आपली डिग्री पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. पण ती पूर्ण झाल्यावर तो नोकरीच्या…

दंशकाल – ह्र्षीकेश गुप्ते

पुस्तकाच्या पृष्ठभागावर दिसणारी विहीर हि फक्त ह्या घराचंच नाही त्या घरामध्ये राहण्याऱ्या माणसांचं देखील प्रतिक आहे. थांग न लागणारी विहीर आणि एकमेकांना धरून तगू पाहणारी माणसे खरंतर माणसाच्या अथांग मनोव्यापाराचं रूपक म्हणून सामोरी येतात.

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम – कविता महाजन

ब्र आणि भिन्न ह्या अतिशय उत्तम आणि लोकप्रिय कादंबरी लिहिण्याऱ्या लेखिकेची अजून एक कादंबरी म्हणून मला ह्या पुस्तकाबद्दल खूप उत्सुकता होती. पण आश्चर्य म्हणजे मला ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू कुठेही नजरेस पडला नाही, त्यामुळे कदाचित मी हे पुस्तक वाचताना माझ्या मनाची अपेक्षा पाटी अगदी कोरी होती. पुस्तकाचं कथासूत्र थोडक्यात सांगायचं तर ही कहाणी आहे पदमजा सप्रे…

Channel 4 Live

माध्यमक्रांती आणि त्याचे परिणाम आपल्या सर्वांना आता परिचयाचे झाले आहेत आता मीडिया केवळ वर्तमानपत्रांपर्यंच मर्यादित न राहता, अन्य उपकरणांद्वारे आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. सततच्या खऱ्या-खोट्या ब्रेकिंग न्यूजच्या माऱ्याने सामान्य माणसाला खरचं गांगरून जायला होत आहे, दर्जापेक्षा चमचमीत बातम्यांना महत्व आल्याने आपल्याला जी प्रस्तुत करतात ती खरंच पूर्ण सत्य बातमी असते का? ह्या पडद्यामागच्या…

Adam

माणसाला नेमकं काय हवं असतं? हि कादंबरी सुरू होते तामिळनाडूमधील एका गावात एका तामिळ ख्रिश्चन कुटुंबामध्ये आणि आपली ओळख होते वरदा राजनायकशी. कुठल्याही सर्वसामान्य मध्यमवगीय कुटुंबसारखच राजनायक कुटुंबीय; वडिलांचा सचोटीचा स्वभाव, त्यामुळे त्यांना मिळणारा आदर आणि होणाऱ्या बदल्या, आईने एका निर्णायक क्षणापर्यंत कुटुंबावर ठेवलेली पकड, दोन्ही मोठ्या बहिणी आणि ह्या सुरक्षित जगात वयात येणारा वरदा….

Shodh

After hearing tonnes of praises for this book, I decided to finally give it a shot. And was I happy, yes indeed!! It was such a thrilling ride. This book handles a kind of not so developed genre in Marathi literature world called Historical Fiction. Yes, there are tonnes of books based on historical people…