नारायण धारप लिखित संक्रमण

भयकथा आणि विशेषतः नारायण धारपांच्या भयकथांचा एक साचा ठरून गेलेला आहे. एखादी विशिष्ट जागा किंवा व्यक्ती आणि त्याभोवती असलेला अमानवी शक्तींचा वावर हे बहुतेक कथानकांमधील मुख्य सूत्र. संक्रमण हि कादंबरीदेखील याच कथासूत्रावर’बेतलेली आहे आणि त्या अर्थाने ती या विशिष्ट वाचनप्रकारच्या वाचकांच्या अपेक्षा पुरेपूर पूर्ण करते परंतु त्याहीपलीकडे जाऊन ती इतरही अतेंद्रिय शक्तींचा धांडोळा घेऊ पाहते….