कृष्णा सोबती लिखित मित्रो मरजानी

एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्ही खूप प्रशंसा ऐकावी, त्याच्या उल्लेखनीय असण्याची नोंद घ्यावी पण काही ना काही कारणाने ते पुस्तक वाचायचं राहून जावं असं माझं ‘मित्रो मरजानी’च्या बाबतीत बऱ्याच वेळा झालं. कधी कधी तर हि अतिप्रशंसा पुस्तकाच्या दर्जाबद्दल देखील प्रश्न उपस्थित करते कारण सध्याच्या काळातील ओव्हर हाईप्ड चीजा खरोखरचं तितपत चांगल्या असतील याची काहीही शाश्वती नाही. पण…

नारायण धारप लिखित संक्रमण

भयकथा आणि विशेषतः नारायण धारपांच्या भयकथांचा एक साचा ठरून गेलेला आहे. एखादी विशिष्ट जागा किंवा व्यक्ती आणि त्याभोवती असलेला अमानवी शक्तींचा वावर हे बहुतेक कथानकांमधील मुख्य सूत्र. संक्रमण हि कादंबरीदेखील याच कथासूत्रावर’बेतलेली आहे आणि त्या अर्थाने ती या विशिष्ट वाचनप्रकारच्या वाचकांच्या अपेक्षा पुरेपूर पूर्ण करते परंतु त्याहीपलीकडे जाऊन ती इतरही अतेंद्रिय शक्तींचा धांडोळा घेऊ पाहते….

सानिया लिखित ओमियागे

सानिया यांच्या कथेतील स्त्रिया ह्या बहुतेक एका विशिष्ट सामाजिक-आर्थिक वर्गातून आलेल्या दिसतात. स्वतंत्र विचारसरणी, व्यवस्थित किंवा उच्च शैक्षणिक पार्शवभूमी आणि स्वतःचे निर्णय घेण्याची मानसिक कुवत असण्याऱ्या स्त्रिया त्यांच्या कथेमध्ये मध्यवर्ती असतात. बहुधा शहरी किंवा निमशहरी भागातील या स्त्रिया एका ठराविक विचारसरणीनुसार त्यांचं आयुष्य व्यतित करणं उचित समजतात. ओमियागे या दीर्घ कथासंग्रहामधील अनिता, सुजाता, सरिता, श्यामल…

महाश्वेता देवी लिखित जटायु

महाश्वेता देवी या त्यांच्या लेखनाच्या अनोख्या शैलीमुळे आणि मुख्यतः ग्रामीण पार्श्वभूमी असण्याऱ्या कथावस्तूंमुळे चिरपरिचित आहेत. त्यांच्या कथा ह्या बहुत करून पूर्वोत्तर राज्यांमध्ये घडतात आणि उपेक्षित, शोषित लोकांच्या व्यथांची गडद छाया त्यांवर पडलेली दिसून येते. उपरोल्लिखित कादंबरी जरी कलकत्ता आणि आसपास घडत असली तरीही कथेच्या पूर्वपीठिकेमध्ये डोकावण्याऱ्या गावांची, वनांची त्यावर दाट सावली आहे. हि कथा घडते…

Belinda | Anant Samant

अनंत सामंत यांच्या कथा आणि कादंबऱ्या त्यांच्या अतिशय वेगळ्या अशा दर्यावर्दी भवतालामुळे, त्यातील खलाशी आणि देशोदेशीच्या नानाविध लोकांच्या कहाण्या मांडण्यामुळे अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ह्या वेगळेपणामुळे त्यांचा असा खास वाचकवर्ग आहे. बेलिंदा ही शीर्षकथा आणि इतर लघुकथा असलेला हा कथासंग्रह देखील आपली निराशा करत नाही. ह्यामधील बेलिंदा आणि ती ही कथा हि समुद्राच्या, जहाजच्या प्रवासात…

दंशकाल |ह्र्षीकेश गुप्ते

पुस्तकाच्या पृष्ठभागावर दिसणारी विहीर हि फक्त ह्या घराचंच नाही त्या घरामध्ये राहण्याऱ्या माणसांचं देखील प्रतिक आहे. थांग न लागणारी विहीर आणि एकमेकांना धरून तगू पाहणारी माणसे खरंतर माणसाच्या अथांग मनोव्यापाराचं रूपक म्हणून सामोरी येतात.

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम |कविता महाजन

ब्र आणि भिन्न ह्या अतिशय उत्तम आणि लोकप्रिय कादंबरी लिहिण्याऱ्या लेखिकेची अजून एक कादंबरी म्हणून मला ह्या पुस्तकाबद्दल खूप उत्सुकता होती. पण आश्चर्य म्हणजे मला ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू कुठेही नजरेस पडला नाही, त्यामुळे कदाचित मी हे पुस्तक वाचताना माझ्या मनाची अपेक्षा पाटी अगदी कोरी होती. पुस्तकाचं कथासूत्र थोडक्यात सांगायचं तर ही कहाणी आहे पदमजा सप्रे…