सानिया लिखित ओमियागे

सानिया यांच्या कथेतील स्त्रिया ह्या बहुतेक एका विशिष्ट सामाजिक-आर्थिक वर्गातून आलेल्या दिसतात. स्वतंत्र विचारसरणी, व्यवस्थित किंवा उच्च शैक्षणिक पार्शवभूमी आणि स्वतःचे निर्णय घेण्याची मानसिक कुवत असण्याऱ्या स्त्रिया त्यांच्या कथेमध्ये मध्यवर्ती असतात. बहुधा शहरी किंवा निमशहरी भागातील या स्त्रिया एका ठराविक विचारसरणीनुसार त्यांचं आयुष्य व्यतित करणं उचित समजतात. ओमियागे या दीर्घ कथासंग्रहामधील अनिता, सुजाता, सरिता, श्यामल…