Belinda | Anant Samant

अनंत सामंत यांच्या कथा आणि कादंबऱ्या त्यांच्या अतिशय वेगळ्या अशा दर्यावर्दी भवतालामुळे, त्यातील खलाशी आणि देशोदेशीच्या नानाविध लोकांच्या कहाण्या मांडण्यामुळे अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ह्या वेगळेपणामुळे त्यांचा असा खास वाचकवर्ग आहे.

बेलिंदा ही शीर्षकथा आणि इतर लघुकथा असलेला हा कथासंग्रह देखील आपली निराशा करत नाही. ह्यामधील बेलिंदा आणि ती ही कथा हि समुद्राच्या, जहाजच्या प्रवासात घडते. बाकी सर्व कथा ह्या शहरात किंवा नागर वस्ती मध्ये घडतात.

बेलिंदा हि खास अनंत सामंत ट्च असलेली कथा – एक खलाशी, त्याला जहाजावर सापडणारी स्टोअवे, त्याने तिची काळजी घेणं, तिला तिच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायला मदत करणं आणि ह्यामध्ये स्वतःच्या आयुष्यावरील धोका पत्करूनही तिच्या प्रेमात पडणं; अगदी गुंतवणारी कथा. तशीच ती- शिपवरचं आयुष्य, समुद्रावरील वादळ आणि त्यामध्ये सापडलेली ती; खासच जमून आलेली कथा.

बाकीच्या कथांपैकी सन्त आणि द ओन्ली वन ह्या मला जास्त भावल्या; जरी त्या शहरात, नागरी वस्ती मध्ये घडतात तरीही त्यामध्ये लेखकाची कॅरेक्टर बिल्डिंगची खास छाप दिसून येते. आपण गुंतत जातो आणि नकळत मनाला चटका बसतो.

उर्वरित कथांबद्दलचा माझा निष्कर्ष कि त्या खूप फिल्मी स्टाइलने लिहिलेल्या, योगोयोगाने भरपूर असण्याऱ्या, काहीशा जुळवून आणलेल्या गोष्टींसारख्या वाटतात.

तरीही लेखकाच्या कथांचे चाहते असण्याऱ्या किंवा लघुकथा हा साहित्यप्रकार आवडण्याऱ्या सर्वांनी वाचावा असा हा कथासंग्रह आहे. सामंतांची लेखन शैली आपल्याला ह्या लघुकथांमधून देखील बांधून ठेवते.